शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मित्राची पोलिस खात्यात निवड, आनंद साजरा करून गावी परतणाऱ्या चौघांवर काळाचा घाला

By आशपाक पठाण | Updated: December 10, 2024 15:22 IST

कारेपूर गावावर शोककळा; वाघाळा पाटीवर कार-ट्रकच्या भीषण अपघातात कारेपूरच्या चार मित्रांचा मृत्यू; पोलिसांत निवड झालेल्या मित्रासह एकजण गंभीर जखमी

रेणापूर (जि.लातूर) : दौंड येथे सीआरपी पोलीस भरतीत मित्राची निवड झाली. त्यामुळे त्याच्यासोबत आनंद साजरा करण्यासाठी जेवणाची पार्टी करून परत येत असताना कार व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना अंबाजोगाईनजीक वाघाळा येथे मंगळवारी पहाटे घडली. यात तिघांचा जागीच मृत्यू तर एकाचा रूग्णालयात मृत्यू झाला. या घटनेमुळे रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावात शोककळा पसरली आहे.

मित्राची पुणे येथे पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे आनंदासाठी स्नेही भोजनाचे आयोजन केले होते. रेणापूर तालुक्यातील कारेपूर या गावातील अजीम पाशामिया शेख या तरुणाची दौंड येथे एसआरपीआय पदावर निवड झाली होती. याच निवडीचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी गावातील सहा तरुण सोमवारी रात्री साडेनऊ ते दहा च्या दरम्यान कार घेऊन बीडनजीक असलेल्या मांजरसुंबा येथे जेवणासाठी गेले होते. पार्टी करून कारेपूर गावाकडे येत असताना छत्रपती संभाजीनगर व लातूर या राष्ट्रीय महामार्गावर वाघाळा (ता.अंबाजोगाई) या गावाजवळ असलेल्या व्यसनमुक्ती केंद्रानजीक ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाली. अपघातात बालाजी शंकर माने (वय २७), दीपक दिलीप सावरे (वय ३० ), फारुख बाबू मिया शेख ( वय ३० ) या तिघांचा जागीच तर ऋतिक हनुमंत गायकवाड (वय २४ ) याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच पोलीस भरती झालेला अजीम पाशामीया शेख (३०) व मुबारक सत्तार शेख (२८) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कारेपूर गावावर शोककळा...मित्राला नोकरी लागल्याने आनंद साजरा करण्यासाठी गेलेले सर्व तरूण रेणापूर तालुक्यातील कारेपूर गावचे आहेत. सोमवारी रात्री मांजरसुंबा येथे जेवण करून मंगळवारी पहाटे मांजरसुंबा येथील ब्रिज खाली शेकोटी करून बसले होते. पहाटे चार वाजता स्विफ्ट कार क्रमांक एम एच १४, एल एल ६७४९ मांजरसुंबा येथून निघून पुढे अंबाजोगाई कारखाना मार्गे कारेपूर गावाकडे जात असताना वाघाळापाटी येथे समोरून येणाऱ्या ट्रकला समोरासमोर कारची धडक झाली. यात चालक दिपक सावरेसह चौघांचा मृत्यू झाला तसेच कारचा चुराडा झाला आहे. दरम्यान, मयत चौघांवरही कारेपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. घटनेची माहिती गावात मिळताच गावावर शोककळा पसरली आहे.

टॅग्स :laturलातूरAccidentअपघातDeathमृत्यू