ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:19 IST2021-05-12T04:19:54+5:302021-05-12T04:19:54+5:30

चाकूर नगरपंचायतीतील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता व घनकचऱ्याचे नियंत्रण ...

Four employees of Oli party were fined Rs 1,000 each | ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

ओली पार्टी करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी हजाराचा दंड

चाकूर नगरपंचायतीतील स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता प्रमोद कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक मुकुंद मस्के, लिपिक व्यंकट सूर्यवंशी, स्वच्छता व घनकचऱ्याचे नियंत्रण शहर प्रमुख सचिन होळंबे यांनी शहरातील एका ढाब्यावर जाऊन ओली पार्टी केली होती. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय धनेश्वर, लक्ष्मण धोंडगे, खालिद हरणमारे, अजित घंटेवाड यांनी त्यांचे व्हिडीओ चित्रीकरण करून, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्याची जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेऊन तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल सादर करण्यास सांगितल होते. हा अहवाल सादर झाल्याने सदरील चार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक हजारांचा दंड आकारण्यात आला, तसेच हॉटेल मालकास १० हजारांचा दंड सुनावला आहे. यापुढील काळात असे गैरवर्तन केल्याचे आढळून आल्यास निलंबित केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांनी सांगितले.

Web Title: Four employees of Oli party were fined Rs 1,000 each