दरवर्षी १० कोटी वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढविले जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:15 IST2021-06-06T04:15:23+5:302021-06-06T04:15:23+5:30
तालुक्यातील नागराळ येथे २० हजार वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रारंभी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. होते. यावेळी जि.प.चे ...

दरवर्षी १० कोटी वृक्ष लागवड करून वनक्षेत्र वाढविले जाणार
तालुक्यातील नागराळ येथे २० हजार वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रारंभी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. होते. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपविभागीय अधिकारी विकास माने, प्रवीण मेंगशेट्टी, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, वन अधिकारी गीते, डिगोळे, तहसीलदार सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी मनोज राऊत, तहसीलदार रामेश्वर गोरे, बीडीओ महेश सुळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, डॉ. सतीश हरिदास, डॉ. दिलीप गुरमे, डॉ. नीळकंठ सगर, डॉ. कापसे, डॉ. हंगरगे, कार्यकारी अभियंता गंगथडे, उपअभियंता एस.एस. पाटील, देवकर उपस्थित होते.
यावेळी सभापती शिवाजीराव मुळे, दिलीप पाटील नागराळकर, राजेश्वर निटुरे, रमेश अंबरखाने, गोविंदराव भोपणीकर, ॲड. अजित बेळकोणे, प्रा. अनिल इंगोले, चंदन पाटील नागराळकर, सरपंच विष्णू ऐनिले, उपसरपंच रतन पाटील, धनराज पाटील, धनंजय गुडसूरकर, मालबा घोणसे, जावेद तांबोळी, मनोज कानाडे, प्रा. वैजनाथ साबणे, सचिन घाळे, शेख फिरोज ताहेर, जाफर मोमीन, जितेंद्र शेवगे, सरपंच बिरादार आदी उपस्थित होते. यावेळी नागराळ ग्रामस्थांतर्फे आशा स्वयंसेविकांचा साडी-चोळी देऊन गौरव करण्यात आला.
प्रत्येक महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड...
राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कोरोनाच्या संकटात ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. त्यामुळे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रत्येक महामार्गाच्या दुतर्फा वृक्ष लागवड संबंधित गुत्तेदारांनी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच त्यावर नजर ठेवली जाणार आहे. नागराळमधील वृक्षारोपणाची ही मोहीम कौतुकास्पद आहे. प्रत्येक वृक्षांची जोपासना व्हावी, यासाठी ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.