औषधी बाहेरुन आणायला लावली; वैद्यकीय अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST2021-04-29T04:14:53+5:302021-04-29T04:14:53+5:30
निलंगा येथे रुग्णांना ठराविक मेडीकल दूकानातून औषध आणण्यासाठी चिठ्ठी दिली जात होती. अशी तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. अनेक ...

औषधी बाहेरुन आणायला लावली; वैद्यकीय अधिकारी निलंबित
निलंगा येथे रुग्णांना ठराविक मेडीकल दूकानातून औषध आणण्यासाठी चिठ्ठी दिली जात होती. अशी तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली होती. अनेक रुग्ण, नातेवाईकांनी या तक्रारी केल्या होत्या. त्यावरुन तहसीलदार गणेश जाधव यांनी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. संबधित मेडीकल दुकानाची तपासणी केली असता डॉ. पाटील यांच्या नावाच्या २५ चिठ्ठ्या आढळून आल्या. या तपासणीचा अहवाल तहसीलदार जाधव यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्यामध्ये कसुर केल्यावरुन डॉ. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे आवश्यक असल्याचे अहवालात म्हंटले. त्यावरुन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना डॉ. पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैद्यकीय अधिकारी गट अ वर्ग २ पदावर असलेल्या डॉ. दिनकर पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, बाहेरून किती रुपयांची औषधी रुग्णांच्या नातेवाईकांना खरेदी करावी लागली याची चौकशी करावी, रेमडेसिविर इंजेक्शनचाही किती वापर झाला याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी केली आहे.