शहरं
Join us  
Trending Stories
1
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
2
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
3
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
4
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
5
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
6
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
7
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
8
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
9
नवी दिल्लीचे झाले गॅस चेंबर; विषारी हवेमुळे श्वास कोंडला
10
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
11
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
12
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
13
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
14
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
15
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
16
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
17
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
18
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
19
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
20
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...

महागाईने विद्यार्थी त्रस्त, मेसचे दर वाढल्याने लातूरमध्ये विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By हणमंत गायकवाड | Updated: August 23, 2022 17:27 IST

गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत

लातूर : शहरामध्ये अनेक विद्यार्थी वसतिगृह, रुम करून शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. शालेय विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थी बाहेरगावची लातूर शहरात मोठ्या प्रमाणात आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी खानावळ (मेस) लावून आपला अभ्यासक्रम पूर्ण करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून खानावळीचे दर वाढल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. मंगळवारी या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन तहसीलदारांना निवेदन दिले. 

मेसचे दर कमी करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. दयानंद गेटपासून घोषणा देत विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय गाठले आणि मेस चालकांना दर कमी करण्यासाठी सूचना द्याव्यात, अशी मागणी केली. लातूर शहरामध्ये दोन ते अडीच हजार रुपये दरमहा खानावळ (मेस) ला पैसे मोजावे लागतात. अकरावी, बारावी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मेस शिवाय दुसरा पर्याय नसतो. मात्र महागाईमुळे गेल्या काही महिन्यांपासून मेस चालकांनी दर वाढविले आहेत. 

स्पर्धा परीक्षा, खाजगी शिकवणी वर्ग तसेच अकरावी, बारावीच्या शिक्षणासाठी बाहेरगावच्या विद्यार्थ्यांचा लोंढा मोठ्या प्रमाणात लातूर शहरात आहे. बहुतांश विद्यार्थी शेतकरी, गरीब तसेच मध्यमवर्गीय कुटुंबातील असतात. मात्र मेस चालकांनी दर वाढविले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी मंगळवारी एकत्र येऊन दरवाढीचा निषेध नोंदविला. तसेच तहसीलदारांना निवेदन देले.

टॅग्स :laturलातूरStudentविद्यार्थी