लातूर ग्रामीणमध्ये पाच रूग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:24 IST2021-09-12T04:24:34+5:302021-09-12T04:24:34+5:30

तांदुळजा (वार्ताहर) : भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या स्थानिक विकास निधीतून लातूर ग्रामीणमध्ये पाच रूग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. ...

Five ambulances in rural Latur | लातूर ग्रामीणमध्ये पाच रूग्णवाहिका

लातूर ग्रामीणमध्ये पाच रूग्णवाहिका

तांदुळजा (वार्ताहर) : भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या स्थानिक विकास निधीतून लातूर ग्रामीणमध्ये पाच रूग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. श्रीगणेश चतुर्थीनिमित्त तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत गरजू रूग्णांना अत्यावश्यक तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी रूग्णवाहिका ही गरज बनली होती. ही गरज लक्षात घेऊन लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील बिटरगाव, कारेपूर, बोरी, तांदुळजा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी एक त्याचबरोबर रेणापूर येथील ग्रामीण रूग्णालयाकरिता एक अशा एकूण पाच सुसज्ज रूग्णवाहिका दिल्या आहेत. पाच रूग्णवाहिकांसाठी ७२ लाख रूपयांचा निधी देण्यात आला आहे. पाचही रूग्णवाहिकांचे लोकार्पण आमदार रमेश कराड यांच्या हस्ते झाले. तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाल्याने परिसरातील सर्वसामान्य जनतेची सोय होणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रूग्णवाहिकेची पूजा केला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई शामसुंदर वाघमारे, पंचायत समितीतील भाजपचे गटनेते भैरवनात पिसाळ, तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. नागापुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, शामसुंदर वाघमारे, युवा मोर्चा सरचिटणीस समाधान कदम, तालुका उपाध्यक्ष शुभम खोसे, परमेश्वर पाणखेडे, महेताब बागवान, रशीद पठाण, प्रदीप गणगे, महादेव गायकवाड यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

कॅप्शन : तांदुळजा प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णवाहिकेचे पूजन जिल्हा परिषद सदस्य मनिषाताई वाघमारे यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. नागापुरे, तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, गटनेते भैरवनाथ पिसाळ, शामसुंदर वाघमारे, महादेव गायकवाड उपस्थित होते.

Web Title: Five ambulances in rural Latur