फिट लातूर,ग्रीन लातूर" सायकल स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:25 IST2021-02-05T06:25:47+5:302021-02-05T06:25:47+5:30
लातूर: ''फिट लातूर ग्रीन लातूर'' ही संकल्पना घेऊन लातूर शहरात ३१ जानेवारी रोजी प्रथमच सायक्लोथोनचे आयोजन करण्यात आले आहे. ...

फिट लातूर,ग्रीन लातूर" सायकल स्पर्धा
लातूर: ''फिट लातूर ग्रीन लातूर'' ही संकल्पना घेऊन लातूर शहरात ३१ जानेवारी रोजी प्रथमच सायक्लोथोनचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे उपक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख स्वतः सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी दिली.
लातूर शहराला हरित आणि शहरातील नागरिकांना सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. रोटरी क्लब ऑफ लातूर मिडटाऊन, रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर मिडटाऊन व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या पुढाकारातून व लातूर शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने या सायक्लोथोन सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत वायू प्रदूषण टाळणे व पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा कमीत कमी वापर करण्यावर भर देणे यासंदर्भात जनजागृती केली जात आहे.