कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी तरुणांच्या जीवावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:29+5:302021-06-05T04:15:29+5:30
लातूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. पहिली लाट ज्येष्ठांना तर दुसरी लाट तरुणांना बाधक ठरली. ...

कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी तरुणांच्या जीवावर !
लातूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तीव्र होती. पहिली लाट ज्येष्ठांना तर दुसरी लाट तरुणांना बाधक ठरली. पहिल्या लाटेत फक्त २५ हजार ३५५ जणांना बाधा झाली होती तर दुसरी लाट तब्बल ६३ हजार ८१० जणांना त्रासदायक ठरली. पहिल्या लाटेत ७०८ जणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या लाटेत तब्बल १ हजार ४८७ जणांचा बळी गेला. एकंदर, पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र स्वरूपाची होती. आता ती ओसरत असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
पहिल्या लाटेत २५ हजार ३५५ रुग्ण आढळले असून, या लाटेत ७०८ जणांचा मृत्यू झाला. ५० ते ७० आणि ७१ ते ८० वयोगटात ५३५ जणांचा मृत्यू झाला. या लाटेत याच वयोगटात सर्वाधिक मृत्यू आहेत तर दुसऱ्या लाटेत ३० ते ५० वयोगटात ३२३ जणांचा मृत्यू झाला. तरुणांना हानी पोहोचविणारी ही लाट ठरली असून, या लाटेचा संसर्ग सुरू आहे. त्यामुळे नियमित मास्क, सुरक्षित अंतर आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीचा अवलंब करावा. नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घ्यावी.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी, लातूर.
तिसऱ्या लाटेची शक्यता
तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. आगामी तिसरी लाट मुलांना हानी पोहोचवेल, असे तज्ज्ञांचे भाकीत आहे. त्यामुळे प्रशासनाने खबरदारी घेतली असून, उपाययोजनाही केल्या जात आहेत. खासगीसह सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये बेडसह औषधोपचारांच्या सुविधा वाढविण्यात आल्या आहेत. शिवाय, बालरोग तज्ज्ञांचा जिल्हास्तरावर टास्क फोर्सही गठित केला आहे.