लातूर रोड येथे पहिली हॅप्पी होम अंगणवाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:24 IST2021-02-05T06:24:25+5:302021-02-05T06:24:25+5:30
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, समाजकल्याण सभापती ...

लातूर रोड येथे पहिली हॅप्पी होम अंगणवाडी
यावेळी आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महिला व बालकल्याण सभापती ज्योती राठोड, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे, पंचायत समितीचे सभापती जमुनाताई बडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी, बापूराव राठोड, हर्षवर्धन कसबे, आदी उपस्थित होते.
अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचे मूल्यमापन करण्यात आले असून या सर्व अंगणवाड्यांचा दर्जा सुधारण्यात येणार आहे. आता नवीन हॅप्पी होम अंगणवाडीतून बलशाली भारताच्या बलशाली नागरिकांची निर्मिती होईल. या कार्यात समाज, लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतनाचा ठराव घेणार
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले, अंगणवाडी हे बालकांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचे केंद्र आहे. ज्या चिमुकल्यांना सांभाळताना घरातील नातेवाईक काही वेळेस हैराण होतात, त्या बालकांना निष्ठा, ममतेने सांभाळणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. त्या तुलनेत अंगणवाडीताई व सेविकांना मिळणारे मानधन कमी आहे. या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दुप्पट वेतन मिळावे, असा ठराव जिल्हा परिषद करणार असून, त्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे.