तंबाखूमुक्त अभियानात भंडारवाडी शाळा तालुक्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:17 IST2021-03-22T04:17:56+5:302021-03-22T04:17:56+5:30

यासाठी मुख्याध्यापक राजाभाऊ जगदाळे, प्रवीण काळे, मीना पवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्राम जाधव यांनी प्रयत्न केले. आरोग्य ...

First in Bhandarwadi school taluka in tobacco free campaign | तंबाखूमुक्त अभियानात भंडारवाडी शाळा तालुक्यात प्रथम

तंबाखूमुक्त अभियानात भंडारवाडी शाळा तालुक्यात प्रथम

यासाठी मुख्याध्यापक राजाभाऊ जगदाळे, प्रवीण काळे, मीना पवळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्राम जाधव यांनी प्रयत्न केले. आरोग्य संघटना आणि केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेले तंबाखूमुक्त शाळेचे नवीन नऊ निकष भंडारवाडी शाळेने पूर्ण केले आहेत. यामध्ये शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांचे सेवनास शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि अभ्यागत यांच्याकडून बंदी असणे, तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था, तंबाखूमुक्त परिसर, शालेय परिसरात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यास त्याला तंबाखू नियंत्रण कायदा-२००३ नुसार २०० रुपयांपर्यंत दंड वसूल येतो. या यशाबद्दल शिक्षणाधिकारी विशाल दशवंत, गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी, शिक्षणविस्तारी सय्यद व केंद्रप्रमुख ज्ञानोबा भिकाणे, सरपंच सावित्राताई शेळके, केंद्रीय मुख्याध्यापक भीमाशंकर स्वामी, मधुकर गालफाडे यांच्यासह पालकांनी कौतुक केले आहे.

Web Title: First in Bhandarwadi school taluka in tobacco free campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.