झरीत गाेठ्याला आग, लाखाचे साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:21+5:302021-03-17T04:20:21+5:30
झरी येथील शेतकरी पंढरी भीमराव खोत यांच्या शेतातील गोठ्याला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात जवळपास लाखाचे साहित्य, ...

झरीत गाेठ्याला आग, लाखाचे साहित्य खाक
झरी येथील शेतकरी पंढरी भीमराव खोत यांच्या शेतातील गोठ्याला रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात जवळपास लाखाचे साहित्य, अन्नधान्य जळून खाक झाले आहे. या घटनेत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. शेतातील गाेठ्यात गहू, हरभरा या पिकांची रास करून गाेठ्यात ठेवण्यात आले हाेते. गाेठ्याशेजारी कडब्याची बनीम व हरभऱ्याच्या गुळीची बनीम हाेती. आगीत १४ कट्टे हरभरा, सहा कट्टे, गहू, केबल वायर, मळणीयंत्राचे साहित्य, ताडपत्री, पत्रे, कडबा असे लाखो रुपयांचे साहित्य खाक झाले आहे.
शेतकऱ्याचा मुलगा
रंजित खोत हा गोठ्याबाहेर झाेपला हाेता. रात्री अचानक गाेठ्याला आग लागली. त्यावेळी गाेठ्यात बांधलेले पशुधन वाचविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तातडीने मदत करावी अशी मागणी रंजित खोत यांनी केली आहे. याबाबत तलाठी बी. सी. राठाेड म्हणाले, महावितरणाच्या विद्युत तारांच्या घर्षणाने सदर शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागली. या आगीत हरभरा, गव्हाचे कट्टे आणि कडब्याची बनीम असा जवळपास लाखाचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे. नुकसानीचा पंचनामा करून अहवाल तहसीलदार यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.