चापोली परिसरात माळरानावर आग; ११५ एकर माळरान जळून खाक ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:35 IST2021-03-04T04:35:47+5:302021-03-04T04:35:47+5:30

आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. प्रारंभी येथील स्थानिक शेतकरी बाबा देशमुख, सर्फराज देशमुख, सिराज पाटील, अझहर ...

Fire at Malrana in Chapoli area; Burn 115 acres of orchards. | चापोली परिसरात माळरानावर आग; ११५ एकर माळरान जळून खाक ।

चापोली परिसरात माळरानावर आग; ११५ एकर माळरान जळून खाक ।

आग आटोक्यात आणण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. प्रारंभी येथील स्थानिक शेतकरी बाबा देशमुख, सर्फराज देशमुख, सिराज पाटील, अझहर देशमुख, अमन देशमुख, अमोल उळागड्डे, प्रकाश शेवाळे, विलास शेवाळे, शिवाजी शेवाळे, मिलिंद सरकाळे, रमेश सरकाळे, बबन उळागड्डे यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी वेळीच धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, कडक ऊन आणि वारे असल्याने आगीने राैद्र रूप धारण केले हाेते. आग पसरत गेल्याने शेतकऱ्यांना आग आटाेक्यात आणता आली नाही. दरम्यान, घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली. सदरची आग आटाेक्यात आणण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. यातूनच मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आग आटाेक्यात आणण्यात यश आले.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार बालाजी चितळे, तलाठी बालाजी हाक्के, तलाठी अविनाश पवार, वनरक्षक पी.के. घुले यांनी भेट देऊन पाहणी केली.

माळरानावरील आगीची दुसरी घटना...

चाकूर तालुक्यातील चापाेली परिसरातील माळरानावर अचानक आग लागल्याने शेकडो एकरवरील शिवार जळून खाक झाले आहे. दीड महिन्यात या परिसरात आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी २१ डिसेंबर रोजी हिप्पळनेर येथील माळरानावर आग लागली हाेती. जवळपास ७२ एकरांवरील शिवार खाक झाले होते. मात्र, दोन्ही घटनांतील आगीचे कारण अद्यापही समाेर आले नाही. या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. आग कशी लागली, याचा शाेध घेण्याची गरज असल्याची भावना परिसरातील शेतकऱ्यांची आहे.

Web Title: Fire at Malrana in Chapoli area; Burn 115 acres of orchards.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.