उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कारवाई करण्यासाठी शहरात पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. त्यात पोहेकॉ. हणमंत आरदवाड, गोरोबा जोशी, पाराजी पुट्टेवाड, ईश्वर स्वामी, तानाजी आरदवाड, सुरेश कलमे, वामण पाटील, सुकेश केंद्रे, सुग्रीव मुंडे, दत्ता थोरमोठे, रवि वाघमारे यांचा समावेश आहे.
पाेलिसांच्या पथकाने सहाजणांविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. ६५ जणाविरुध्द दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ४९० जण विनामास्क फिरत होते. त्यांच्याकडून ७० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. दुचाकीवर विना हेल्मेट फिरणा-या १२ चालकांकडून ६ हजार रुपयांचा दंड वसूल केला. कोरोनावर मात करण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सर्वांनी नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण फिरू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी केले आहे.