ग्राहक चौकस राहून खरेदी करताना दिसत नाही. वस्तू खरेदी करताना एमआरपी व एक्सपायरी डेट पाहूनच खरेदी करावी. तसेच खरेदी केलेल्या वस्तूची पावती घ्यावी. यामुळे खराब वस्तू बदलून घेता येईल किंवा वस्तूची रक्कम परत मिळेल. गॅस सिलेंडरच्या बाजुला वजन व एक्सपायरी डेट असते. खात्री करूनच गॅस सिलेंडर घ्यावा, डिलेव्हरी चार्ज वेगळे देण्याची गरज नाही. तसेच मिठाई घेताना बॉक्स सह वजन करून घेऊ नये. मेडीसीन, खत, बियाणे व पेट्रोल पंपावर खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. यातून ग्राहकांचे हित जोपासले जाऊन आर्थिक नुकसान टाळता येणार आहे. असे अभिजीत औटे यांनी सांगीतले. यासाठी जिल्हाभरात या राष्ट्रीय ग्राहक दिनापासून जन-जागृती अभियान प्रभावीपणे राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे ते म्हणाले.
ग्राहकांना आर्थिक नुकसान टाळता येइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST