चिंच फोडणीतून संसाराचा आर्थिक आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:19 IST2021-04-10T04:19:09+5:302021-04-10T04:19:09+5:30

येरोळ : उन्हाळा सुरू झाला की, येरोळ व परिसरातील महिलांच्या हाताला चिंच फोडणीचे काम मिळते. त्यातून संसाराला आर्थिक आधार ...

The financial backbone of the world from the tadpole burst | चिंच फोडणीतून संसाराचा आर्थिक आधार

चिंच फोडणीतून संसाराचा आर्थिक आधार

येरोळ : उन्हाळा सुरू झाला की, येरोळ व परिसरातील महिलांच्या हाताला चिंच फोडणीचे काम मिळते. त्यातून संसाराला आर्थिक आधार मिळत आहे. फोडणीसाठी प्रति किलो १० ते १५ रुपये अशी मजुरी दिली जाते. त्यामुळे महिलांना रोजगार मिळत आहे.

शिरुर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ व परिसरात मोठ्या प्रमाणात चिंचेची झाडे आहेत. चिंचेला तोर लागल्यानंतर शेतकरी चिंचेच्या झाडांची विक्री करतात. त्यामुळे मोठी आर्थिक उलाढाल होत असते. दरम्यान, हे व्यापारी चिंचा झाडून त्या फोडणीसाठी महिलांकडे देतात. चिंच फोडण्यासाठी महिलांना १० ते १५ रुपये प्रति किलो मजुरी दिली जाते. लातूरच्या बाजारपेठेत चिंचेला १० हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे. सध्या दरात घसरण झाली आहे. हैदराबाद येथील बाजारपेठेत चिंचेला ७ ते ९ हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत आहे.

चिंचा झाडावर परिपक्व झाल्यानंतर, त्या झोडपण्यासाठी व गोळा करण्यासाठी मजुरांना दररोज ५०० रुपये तर महिलांना ३०० रुपये रोजगार दिला जात आहे. कोरोनाच्या संकटात महिना-दीड महिना महिलांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे सध्या बहुतांश घरांतील महिला चिंचा फोडण्यात व्यस्त आहेत. एका-एका व्यापाऱ्याकडून १० ते १५ महिलांना रोजगार मिळत आहे. या चिंचा लातूर, उदगीर आणि हैदराबाद येथील बाजारपेठेत विक्रीसाठी जात असल्याचे आडत व्यापारी कचरू मद्रेवार यांनी सांगितले.

चिंचेचे उत्पादन अधिक...

शिरूर अनंतपाळ तालुक्यातील येरोळ, डिगोळ, दैठणा, तळेगाव, साकोळ, हिप्पळगाव, राणी अंकुलगा, सुमठाणा, चामरगा, शिवपूर, धामणगाव आणि नदीकाठच्या पाणंद रस्त्यानजीक, तसेच शेताच्या बांधावर चिंचेचे मोठे वृक्ष आहेत. नगदी उत्पन्न देणारे हे फळ आहे. चिंचेच्या व्यवसायातून तरुणांना रोजगार मिळत आहे.

चिंचोक्यासही मागणी...

चिंचेच्या वरील टरफल हे वीटभट्टीसाठी वापरले जाते, तर चिंचोक्याचा उपयोग हा उपयुक्त साहित्य बनविण्यासाठी केला जातो. त्यामुळे बाजारपेठेत चिंचोक्यासही मागणी असल्याचे चिंचेचे व्यापारी जहरुद्दीन शेख यांनी सांगितले.

Web Title: The financial backbone of the world from the tadpole burst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.