नऊ तालुक्यांची अंतिम पैसेवारी आली निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:49+5:302021-01-03T04:20:49+5:30
पीक कापणी प्रयोगातून निश्चिती... खरीप पिकांच्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उतारा तपासण्यात आला. त्याआधारे निघालेली आणेवारी ही शेतकऱ्यांचे उत्पन्न ...

नऊ तालुक्यांची अंतिम पैसेवारी आली निम्म्यावर
पीक कापणी प्रयोगातून निश्चिती...
खरीप पिकांच्या पीक कापणी प्रयोगाच्या माध्यमातून उतारा तपासण्यात आला. त्याआधारे निघालेली आणेवारी ही शेतकऱ्यांचे उत्पन्न निम्म्याने घटल्याचे दर्शविण्यात आले आहे. नऊ तालुके ५० पैशांपेक्षा कमी आहेत. केवळ एकच रेणापूर तालुक्याची आणेवारी ६२ पैसे आहे. एकंदर आलेल्या आणेवारीत जिल्ह्यातील खरीप पिकांचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले आहे. प्रशासनाच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या आणेवारीत ही बाब समोर आली आहे.
आणेवारीची कशी होते मदत...
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांचे शेतीतून मिळणारे उत्पन्न घटले तर त्यांना मदत देण्यासाठी आणेवारी उपयुक्त ठरते. यातही ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असेल तर त्या भागातील शेतकऱ्यांना मदत होते. यावर्षी शासनाने अतिवृष्टीनंतर लागलीच मदत जाहीर केली. मात्र, ही मदत संपूर्ण जिल्ह्यात मिळाली नसल्याने सदरील आणेवारीवर काहीतरी मदत मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
तालुका गावांची संख्या पैसेवारी
लातूर १२३ ४९
औसा १३३ ४८
रेणापूर ७६ ६२
उदगीर ९९ ४७
जळकोट ४७ ४६
अहमदपूर १२४ ४८
चाकूर ८५ ४८
निलंगा १६२ ४८
देवणी ५४ ४७
शिरूर अनंतपाळ ४८ ४७