ऑटाेत प्रवासी घेण्याच्या कारणावरून हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:47+5:302021-01-21T04:18:47+5:30
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे ऑटोमध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून फिर्यादी जलील महंमदसाब शेख यांचा चुलत भाऊ व इतरांवर ...

ऑटाेत प्रवासी घेण्याच्या कारणावरून हाणामारी
पाेलिसांनी सांगितले, उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे ऑटोमध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून फिर्यादी जलील महंमदसाब शेख यांचा चुलत भाऊ व इतरांवर गावातील १९ जणांनी लोखंडी रॉड, काठी, दगड व चाकूने मारहाण करीत गंभीर दुखापत केली. शिवाय, साक्षीदाराच्या ऑटाे, जीपचे नुकसान केले. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकास अटक करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे म्हणाले.
चौघाजणांना पाेलीस काेठडी
हैबतपूर घटना : उदगीर ग्रामीण पाेलिसांकडून तपास
उदगीर : तालुक्यातील हैबतपूर येथील तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणी उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेत अटक करण्यात आलेल्या चार आरोपींना उदगीर येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, हैबतपूर येथील एका तरुणाला पैशाच्या देवाणघेवाणीच्या कारणावरून जबर मारहाण करण्यात आली हाेती. दरम्यान, उपचार सुरू असताना सदर तरुणाचा मंगळवारी (दि. १९) मृत्यू झाला. याबाबत उदगीर ग्रामीण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पाेलिसांच्या पथकांनी चाैघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांना बुधवारी उदगीर येथील न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने चौघाजणांना २५ जानेवारीपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांनी दिली.