बचत गटामार्फत खत, बियाणे विक्री सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:23+5:302021-06-19T04:14:23+5:30
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आंदलगाव येथील हिरकणी महिला ग्राम संघ बचत गटाच्या वतीने गावातच कमी दरामध्ये खत व ...

बचत गटामार्फत खत, बियाणे विक्री सुरू
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत आंदलगाव येथील हिरकणी महिला ग्राम संघ बचत गटाच्या वतीने गावातच कमी दरामध्ये खत व बी-बियाणे विक्रीचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हिरकणी महिला ग्राम संघ आंदलगाव बचत गटाच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांसाठी कमी दरामध्ये व गर्दी टाळण्यासाठी खत, बी-बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. या बियाणांच्या विक्रीचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, पोहरेगाव जिल्हा परिषद गटाचे सदस्य उद्धव चेपट, रेणापूर पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, सरपंच वर्षाराणी सोनटक्के, उपसरपंच सचिन शिंदे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, गटविकास अधिकारी मोहन अभंगे, सहायक गटविकास अधिकारी गोस्वामी, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग वैभव गोराले, अभियान व्यवस्थापक ढवळे, ग्रामसेवक गणेश इस्ताळकर, बिभिषण कदम, ज्ञानेश्वर कदम, भागवत कोलबुरे, ज्ञानेश्वर सोनटक्के, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक खंडागळे, महिला बचत गट सर्व सदस्य, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
महिला बचत गटाने खतापासून सुरुवात केली आहे. याच्यापुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या बी-बियाणे, औषध खरेदी करून त्यांची विक्री व वाटप करावे. त्याचबरोबर उलाढाल वाढवण्यासाठी जिल्हास्तरावरून तुम्हाला गोडाऊन माल कुठून आणायचा, कोणाला विक्री करायचा, यासाठी मदत केली जाईल. त्याचबरोबर या गटाला होलसेल दुकानदार जोडून देऊन कमी दरात खत, बी-बियाणे व देण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देऊ व शेतकऱ्यांना इतरत्र खत, बी-बियाणे खरेदीसाठी प्रोत्साहित करावे. या बचत गटाने हा उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा उपक्रम असून हे अभिनंदनीय असल्याचे सीईओ अभिनव गोयल म्हणाले.