प्रवासातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:49+5:302021-03-08T04:19:49+5:30
दिसून येत आहे. ही बाब कोरोना विषाणूचा संसर्ग एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झपाट्याने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते, याशिवाय स्वत:सोबतच ...

प्रवासातून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती
दिसून येत आहे. ही बाब कोरोना विषाणूचा संसर्ग एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात झपाट्याने पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते, याशिवाय स्वत:सोबतच अनेकांचे आरोग्यदेखील धोक्यात सापडू शकते. त्यामुळे नागरिकांच्याच सोयीसाठी सुरू झालेल्या बसमध्ये नियमांचे तंतोतंत पालन करणे अत्यावश्यक ठरत असल्याचा सूर सूज्ञ नागरिकांमधून उमटत आहे.
लांब पल्ल्याच्या, ग्रामीण बसेस खचाखच...
अहमदपूर आगारातून जाणाऱ्या दररोज जाणाऱ्या
लांब पल्ल्याच्या सुटलेल्या एस.टी. बसेस प्रवाशांच्या गर्दीने खचाखच भरून जात असल्याचे दिसून येत आहे. एखादा अपवादवगळता यातील अनेकांनी तोंडाला मास्कदेखील लावलेला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब धोकादायक ठरत आहे.
नियम लादूनही स्वतंत्र बसण्याची तयारी नाही
कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास निरोगी व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे विशेषतः प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळणे, मास्कचा वापर करणे आवश्यक ठरत आहे, तसे आवाहन प्रशासकीय पातळीवरून वारंवार केले जात आहे. प्रत्यक्षात मात्र नागरिकांकडून नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. एस.टी.बसमध्ये एका सीटवर एकाच व्यक्तीने बसून प्रवास करावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, एकाच कुटुंबातील अधिक सदस्यांची वेगवेगळे बसण्याची तयारीच नसल्याचे दिसून येत आहे. विना मास्क प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये, असे वाहकांना आदेश देण्यात आले आहे. प्रवाशांनी बसमध्ये मास्क परिधान करूनच प्रवास करावा. विना मास्क प्रवाशांना बसमध्ये प्रवास करण्यास दिला जाणार नाही.
- एस. जी. सोनवणे,
आगारप्रमुख ,अहमदपूर