पुलावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:19 IST2021-01-23T04:19:52+5:302021-01-23T04:19:52+5:30
नांदेड- बिदर राज्यमार्गावरील गाद्याच्या पुलाजवळ जमिनीस्तर पूल आहे. या पुलावर मागील काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा ...

पुलावरील खड्ड्यामुळे अपघाताची भीती
नांदेड- बिदर राज्यमार्गावरील गाद्याच्या पुलाजवळ जमिनीस्तर पूल आहे. या पुलावर मागील काही दिवसांपासून मोठा खड्डा पडला आहे. तो खड्डा खालच्या बाजूने पोखरला गेला आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. अवजड वाहनांसह एसटी. बसेस, खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने, दुचाकींची दिवसरात्र रेलचेल असते. अशातच हाळी हंडरगुळी येथील जनावरांचा बाजार सुरू झाल्याने जनावरे घेऊन जाणारी वाहने याच मार्गावरून धावतात. हाळी ते वायगावपाटी दरम्यान लहान मोठे पूल आहेत. वायगाव पाटीजवळ एक जमिनस्तर पूल आहे. त्या पुलावरील रस्त्यावर काही महिन्यांपासून मोठा खड्डा पडला आहे. खड्ड्याच्या खालील बाजूला तो जास्तीचा खिळखिळ झाला आहे. खड्ड्याच्या बाजूला जर वाहन गेले तर ते खाली दबण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन दुरूस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांसह नागरिकांतून होत आहे.