शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

लातूर जिल्ह्यात तिघांचा पाणीबळी; विहिरीतील गाळ काढताना वडील, मुलगा अन पुतण्याचा गुदमरूम मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:00 IST

विहीर अत्यंत अरुंद असल्याने ऑक्सिजनची कमी आहे.

आलमला (जि. लातूर) : पाणी कमी येत असल्यामुळे आडात उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्या असून, ही घटना औसा तालुक्यातील आलमला येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली.

आलमला गावात तीव्र पाणीटंचाई असून, गावभागात खाजगी मालकीची जुनी विहीर बुजवून त्यात सिमेंट टाक्या बसवून आड तयार करण्यात आला होता. वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांना येथून पाणी पुरवठा आहे. सदरील आडात असलेल्या मोटारीला पाणी का येत नाही म्हणून सोमवारी सकाळी काही तरुण आडात उतरले. सर्वात आधी सद्दाम फारुख मुलानी (२२) हा आडात उतरला होता. तो वर का येत नाही म्हणून त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) हेही आडात उतरले. तेही परत न आल्याने पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) हा आडात उतरला. आडात उतरलेल्या कोणाचाच प्रतिसाद येत नसल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. यावेळी दोन तरुणांच्या कमरेला दोरखंडाने बांधून त्यांना आडात सोडण्यात आले. मात्र त्यांनाही गुदमरल्यासारखे झाल्याने तात्काळ वर काढण्यात आले. तद्नंतर त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आडात आॅक्सिजन सोडले. परंतु, प्रतिसाद येत नसल्याने अग्निशमनचे कर्मचारी आडात उतरले. शेवटी मोठ्या कसरतीनंतर त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब लागला. तोपर्यंत फारुख खुदबुदीन मुलानी, मुलगा सद्दाम फारुख मुलानी, पुतण्या सईद दाऊद मुलानी या तिघांचाही मृत्यू झाला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी औसा येथील रुग्णालयात झाली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, तहसीलदार, आरोग्याधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

मुलानी कुटुंबियावर शोककळा... काबाड कष्ट करून उपजीविका भागविणाऱ्या मुलानी कुटुंबियांतील तिघांचा आडात गुदमरून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. मुलानी कुटुंबियासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

१५ दिवसांपूर्वी झाला होता सद्दामचा विवाह... पाणी का येत नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा आडात उतरलेल्या सद्दाम मुलानी याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. गावात प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेला धावून जाणारा सद्दाम सोमवारीही सर्वात आधी आडात उतरला होता. सद्दाम उत्साहाने प्रत्येकाला मदत करीत असे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह सोहळ्यात आनंदात असलेल्या मुलानी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरAccidentअपघात