१२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:18 IST2021-04-17T04:18:34+5:302021-04-17T04:18:34+5:30
बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बी. नारायणराव यांचे काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे येथील विधानसभेची एक जागा रिक्त ...

१२ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात सील होणार
बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार बी. नारायणराव यांचे काही महिन्यांपूर्वी अकाली निधन झाले. त्यामुळे येथील विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. त्यासाठी निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली. शनिवारी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वा. पर्यंत मतदान होणार आहे. १२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी २ लाख ३९ हजार मतदार आहे. त्यात १ लाख १४ हजार ७९४ महिला तर १ लाख २४ हजार ९८४ पुरुष मतदार आहेत.
या निवडणुकीसाठी एकूण १ हजार ५६८ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कर्नाटकातील बेळगाव लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. तसेच रायचूर जिल्ह्यातही विधानसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्यामध्ये सत्तेत असलेल्या भाजपा, काँग्रेस व जनता दलासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. २ मे रोजी निकाल लागणार आहे.