शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:24+5:302021-06-20T04:15:24+5:30

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, जेणेकरून जमिनीची पोत टिकण्यास मदत होईल व शेतीला ...

Farmers should turn to bamboo cultivation | शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी बांबू लागवड करावी, जेणेकरून जमिनीची पोत टिकण्यास मदत होईल व शेतीला जोडव्यवसायासह शेती फायद्याची ठरणार आहे, असे प्रतिपादन तहसीलदार गणेश जाधव यांनी येथे केले.

मसलगा येथे शनिवारी यशवंत दिलीपराव पाटील यांच्या शेतामध्ये दीड एकर क्षेत्रावर तहसीलदार गणेश जाधव साहेब यांच्या हस्ते बांबू लागवड करण्यात आली, तसेच या तरुणाने आधुनिक पद्धतीने बांबू लागवड सुरू केल्याने या तरुणाचे कौतुक करत तालुक्यातील इतरही शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये बांबू लागवड करावी, असे आवाहन तहसीलदार गणेश जाधव यांनी केले आहे. आधुनिक पद्धतीने बांबू लागवड पाहण्यासाठी तहसीलदार गणेश जाधव शेतकऱ्याच्या बांधावर गेले. यावेळी त्यांनी शेतकऱ्याने दिलेली टोपीही परिधान केली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र धुमाळ, कृषी सहायक कटारे, सरपंच रमेश पाटील, उपसरपंच तुळशीदास साळुंके, पोलीस पाटील संतोष नरहरे, तंटामुक्त अध्यक्ष मोहनराव पिंड, विलास पाटील, गुरुनाथ जाधव, दिलीप जाधव, दिलीप पाटील, धोंडीराम पिंड, श्रीधर मोहिते, चंद्रकांत पवार आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Farmers should turn to bamboo cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.