शेतकरी, कष्टकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:18+5:302021-07-18T04:15:18+5:30
जळकोट : शिवसेना कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करावी. तसेच शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा, ...

शेतकरी, कष्टकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा
जळकोट : शिवसेना कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मदत करावी. तसेच शेतकरी, कष्टकरी, गोरगरिबांचे प्रश्न, अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केले.
येथे शिवसंपर्क अभियानांतर्गत शहर, उपशहर, वॉर्ड, बुथ प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रामचंद्र अदावळे, तालुकाप्रमुख संगमेश्वर टाले, तालुका संघटक बालाजी ठाकूर, शहरप्रमुख मन्मथ बोधले, उपशहरप्रमुख शंकर सोप्पा, बालाजी खोंटे, रामलिंग धुळशेट्टे, पूजन उळागड्डे, प्रशांत मुगावे, हरिश जोशी, शंकर नामवाड, रामदास माळी, नितीन नामवाड, सुनील कमलापुरे, वळगे महाराज, शुभ टाळे, गोविंद डांगे यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रेड्डी म्हणाले, जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी गोरगरीब, शेतकरी, कष्टकऱ्यांच्या हितासाठी काम करावे. शासकीय कार्यालयांत अडीअडचणी येत असतील तर त्या सोडवाव्यात. आगामी नगर पंचायत निवडणुकीत शिवसेनेची सत्ता आणण्यासाठी सज्ज राहून कार्य करावे, असे आवाहन केले. प्रास्ताविक सचिन भोसले यांनी केले.