शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानात सहभागी व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:08+5:302021-03-13T04:36:08+5:30

औसा तालुक्यातील लामजना येथील ग्रामपंचायत कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत महारेशीम अभियान कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी ते ...

Farmers should participate in the Maharashtra campaign | शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानात सहभागी व्हावे

शेतकऱ्यांनी महारेशीम अभियानात सहभागी व्हावे

औसा तालुक्यातील लामजना येथील ग्रामपंचायत कार्यालयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत महारेशीम अभियान कार्यक्रम घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच खंडेराव फुलारी होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील, कृषी सहायक रवी कावळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी येथे कृषी संजीवनीअंतर्गत नवीन कार्यकारिणी स्थापना करण्यात आली.

तालुका कृषी अधिकारी संजयकुमार ढाकणे यांनी तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या अभियानात सहभाग नोंदवावा, असे सांगून तुती लागवडीबाबत तुती रोपे तयार करणे, रेशीम साहित्य, कीटक संगोपन, गृहबांधकामाबाबतचे अर्थसाहाय्य याबाबत माहिती दिली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.के. गिरी, उपसरपंच बालाजी पाटील, कृषीमित्र महम्मद रफिक बिरादार, प्रगतिशील शेतकरी इंद्रजित शिंदे, ग्रामपंचायत सदस्य असद पटेल, सचिन कांबळे, बालाजी शिंदे, राम कांबळे, महेश सगर, नजीर पटेल, रहीम शेख, सोमनाथ सावळकर, बब्रूवान बिराजदार, पोकराचे प्रवीण बेळंबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. आभार राम कांबळे यांनी मानले.

Web Title: Farmers should participate in the Maharashtra campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.