मग्रारोहयोतून शेतकऱ्यांनी शेतीचा विकास करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST2021-06-04T04:16:32+5:302021-06-04T04:16:32+5:30
कृषी व मनरेगाच्या माहिती दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी, ...

मग्रारोहयोतून शेतकऱ्यांनी शेतीचा विकास करावा
कृषी व मनरेगाच्या माहिती दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंचायत समिती सदस्य दीपक चाबुकस्वार, ग्रामपंचायत सदस्य भास्कर सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी संजय ढाकणे, मंडळ अधिकारी एस.व्ही. गरगटे, कृषी मंडळ अधिकारी पिनाटे, संतोषअप्पा मुक्ता, संजय कुलकर्णी, सोनकांबळे, उपसरपंच बंडू मसलकर, शिवाजी फावडे, चेअरमन यशवंतराव शिंदे, मधुकर सूर्यवंशी, रमेश शिंदे, पोहेकॉ. संजय फुलारी, प्रल्हाद सिरमवाड, तलाठी रोहित धावडे, लाईनमन बालाजी म्हेत्रे, कृषी सहायक मारोती वाघमारे, कमलाकर सूर्यवंशी, दिलीप पाटील, यशवंतराव सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
यावेळी आ. अभिमन्यू पवार म्हणाले, वृक्ष लागवड, सिंचन विहिरी, शेत रस्ते मजबुतीकरण, गोठा, शेततळे, सिमेंट रस्ता, वैयक्तिक लाभाच्या १९ योजनांचा लाभ मनरेगाअंतर्गत घ्यावा. ही योजना प्रत्यक्षात अमलात आणावी. यात ७७ योजना असून कृषी सहायकांनी अभ्यास करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
यावेळी भास्कर सूर्यवंशी यांनी शेतीचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. शेत शिवारातील चार डीपी जळाल्या असून महावितरणचे दुर्लक्ष असल्याची समस्या मांडली.