खरीप हंगामपूर्व शेतीकामे करण्यात शेतकरी व्यस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:41+5:302021-05-05T04:32:41+5:30
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी घरातच थांबत असल्याने शेतीची कामे मागे पडत आहेत. ...

खरीप हंगामपूर्व शेतीकामे करण्यात शेतकरी व्यस्त
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकरी घरातच थांबत असल्याने शेतीची कामे मागे पडत आहेत. खरीप हंगामासाठी दीड महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. हंगामपूर्व कामे लवकर पूर्ण करण्यासाठी शेतकरी उन्हाचे चटके सहन करीत शेतीकडे जात असल्याचे दिसून येत आहे. ब्रेक द चेनअंतर्गत कडक नियमांमुळै छोटे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे हे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी शेती कामात मग्न झाले आहेत.
गत आठवड्यापासून अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे रब्बीतील गहू तसेच टोमॅटो, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामांना सुरुवात केली आहे. हळद व भुईमूग काढणीसह शेतात नांगरणी, शेणखत टाकणे, दसकट वेचणे आदी कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे.