सेवानिवृत्त हालसे यांचा सत्कार करून निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:32 IST2021-05-05T04:32:37+5:302021-05-05T04:32:37+5:30
... पक्ष्यांच्या पाण्यासाठी झाडाला बांधल्या येळण्या किल्लारी : येथील तलाठी विकास बुबणे यांनी पक्ष्यांच्या पाण्यासाठी शंभर ठिकाणी झाडाला येळण्या ...

सेवानिवृत्त हालसे यांचा सत्कार करून निरोप
...
पक्ष्यांच्या पाण्यासाठी झाडाला बांधल्या येळण्या
किल्लारी : येथील तलाठी विकास बुबणे यांनी पक्ष्यांच्या पाण्यासाठी शंभर ठिकाणी झाडाला येळण्या बांधून पाणपोई सुरू केली आहे. तसेच खाद्यही टाकले जात आहे. उद्घाटन खा. ओमराजे निंबाळकर यांच्याहस्ते झाले. उन्हाळ्यात पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून हा उपक्रम राबविला आहे. तलाठी कार्यालय, बाजार चौक, ग्रामपंचायत कार्यालय अशा विविध सार्वजनिक ठिकाणी या येळण्या बांधल्या आहेत. त्यांचे कौतुक होत असून, पर्यावरणप्रेमींतून समाधान व्यक्त होत आहे.
...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे
वलांडी : तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो रोखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन तहसीलदार सुरेश घोळवे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. मागीलवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात होती. मात्र, यंदा नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. संचारबंदी असतानाही काहीजण रस्त्यावर फिरत आहेत. छोट्या- छोट्या कारणांवरून नागरिक फिरत आहेत. प्रत्येकाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नियमांचे पालन करावे, असेही तहसीलदार सुरेश घोळवे यांनी म्हटले आहे.
...
काजळे चिंचाेली येथे सॅनिटायझरचे वाटप
बेलकुंड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औसा तालुक्यातील चिंचोली काजळे येथील ग्रामपंचायतीच्यावतीने घरोघरी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच काका पवार, सुनील शेलार, हाजू शेख, नीळकंठ पाटील, शंकर निगुडगे, विश्वनाथ निगुडगे, आयुब कादरी, बालाजी माेरे, पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते. नागरिकांनी मास्कचा वापर करावा. कोरोनासंदर्भातील लक्षणे जाणवत असल्यास तात्काळ आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.