अहमदपुरात लाडक्या गणरायाला निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:08+5:302021-09-21T04:22:08+5:30

अहमदपुरात अनेक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अहमदपूर शहरात प्रत्येक वर्षी हलते तसेच स्थिर देखावेही सादर ...

Farewell to Ladakya Ganaraya in Ahmedpur | अहमदपुरात लाडक्या गणरायाला निरोप

अहमदपुरात लाडक्या गणरायाला निरोप

अहमदपुरात अनेक गणेश मंडळांकडून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अहमदपूर शहरात प्रत्येक वर्षी हलते तसेच स्थिर देखावेही सादर करण्यात येतात. परंतु यावर्षी देखाव्यांना देखील फाटा दिला होता. गणेशोत्सवानिमित्त होणारे मनोरंजनाचे सर्व कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. रविवारी दुपारी दोन वाजता आजोबा गणपतीची आरती झाल्यानंतर

अहमदपुरात परंपरेनुसार श्रींच्या स्थापनेनंतर १० व्या दिवशी निरोप दिला जातो. यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी रविवारी लाडक्या गणरायास भावपूर्ण निरोप देत प्रशासनाला सहकार्य केले. परंपरेनुसार महादेव गल्ली येथील बाल सार्वजनिक गणेश मंडळ मानाच्या आजोबा गणपतीची आरती नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, बाबूराव बावचकर, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, नगरसेवक राहुल शिवपूजे, नगरसेवक रवी महाजन, ॲड. निखिल कासनाळे, संगम कुमदळे ,नगरसेवक संदीप चौधरी, ॲड. किशोर कोरे, सुनील कोरे, बाल सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रफुल कल्याणी, सचिव संतोष निटूरे, अभिजित पुणे यांच्या हस्ते झाली. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरातील २२ तर, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील १९ अशा एकूण ४१ श्रींचे विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आरती केल्यानंतर नगरपालिकेशी संपर्क साधून मूर्ती विसर्जनासाठी देत होते. शहरातील गणेश विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे आठ ट्रॅक्टर लावण्यात आले होते. एका ट्रॅक्टरवर नगरपालिकेचे सहा कर्मचारी व दोन पोलीस कर्मचारी अशा आठ जणांची नेमणूक होती. नांदेड रोडवरील मुख्य राज्य महामार्गावरील मरशिवणी येथे असलेली विहीर तर, दुसऱ्या ठिकाणी गायकवाड कॉलनी येथील रेड्डी यांच्या विहिरीत व्यवस्था करण्यात आली होती.

शहरात शांततेत विसर्जन व्हावे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजिले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, सात पोलीस उपनिरिक्षक, ५८ पोलीस कर्मचारी, आरपीसी तीन तुकड्या, ७५ होमगार्ड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

फोटो कॅप्शन : प्रथम मानाचा आजोबा गणपती बाल सार्वजनिक गणेश मंडळ, महादेव गल्ली येथे महाआरती करताना पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, नगराध्यक्षा अश्विनीताई कासनाळे, नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, बाबूराव बावचकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Farewell to Ladakya Ganaraya in Ahmedpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.