शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र कोल्हापुरात व्हायरल!

By राजकुमार जोंधळे | Updated: June 4, 2025 10:58 IST

भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव; बेरोजगारांच्या फसवणुकीचा प्रयत्न

लातूर : बेरोजगारांची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लातूर येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीचे बनावट पत्र सोशल मीडियात विशेषता कोल्हापुरात व्हायरल झाले आहे. या पत्राद्वारे तरुणांना रोजगार देण्यासाठी भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याचा बनाव करण्यात आला. दरम्यान, हे पत्र बनावट असून, असे कोणतेही आदेश लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नसल्याचे मंगळवारी स्पष्ट करण्यात आले. बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी एसआयएस इंडिया लि. या खासगी कंपनीमार्फत क्षेत्रीय स्तरावर भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र व्हायरल झाले. विशेष म्हणजे ते पत्र जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले.

या पत्रात सुशिक्षित बेरोजगारांना सुरक्षा क्षेत्रातील प्रशिक्षण देऊन त्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळावा, यासाठी खासगी कंपनीद्वारे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्यात येत असल्याचे म्हटले होते.

नामांकित कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन शुल्क घेतले जाणार असल्याचेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या डिजिटल स्वाक्षरीने व क्रमांक, दंड/०५/कावि/४०८८१७३/२०२५ दि. २८.०५.२०२५ अन्वये जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांना निर्गमित करण्यात आल्याचे भासविण्यात आले होते.

फसवणुकीपासून सावध राहा...

लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती रजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित करण्याबाबत कोणतेही पत्र निर्गमित करण्यात आलेले नाही. अशा बनावट पत्राद्वारे केल्या जाणाऱ्या फसवणुकीपासून सर्वांनी सावध राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी