शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

लातुरातून दिवाळीसाठी लांबपल्ल्याच्या मार्गावर जादा बसेसची साेय! पुणे मार्गावर १४ फेऱ्यांची वाढ

By राजकुमार जोंधळे | Updated: October 17, 2022 19:40 IST

पुणे शहरातील कॅन्टाेन्मेंट मैदान, खडकी येथून लातूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दरराेज रात्री सहा बसफेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे.

लातूर : दिवाळीसाठी प्रवाशांच्या साेयीसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. लातूर विभागातील लातूर, उदगीर, अहमदपूर, निलंगा आणि औसा बसस्थानकातून लांबपल्ल्यांच्या मार्गावर या बसेस धावणार आहेत. यासाठी लातूर-पुणे मार्गावर १४ जादा फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिवाळी सणासाठी १७ ते ३१ ऑक्टाेबर या काळात जादा बसेस आणि फेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. लातूर ते पुणे मार्गावर सर्वाधिक बसेस धावणार आहेत. पुणे वल्लभनगर मार्गावर लातूर, उदगीर, निलंगा, औसा आगारातून बसेस धावणार आहेत. पुणे येथून लातूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची गर्दीचा विचार करून, यावर्षी पुणे कॅन्टाेनमेंट मेदान, खडकी येथून दरराेज १९ ते २३ ऑक्टाेबर या काळात पाच दिवसासाठी सहा जादा बसेसचे नियाेजन करण्यात आले आहे. त्यासाठी संगणकीय आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे.

अशा आहेत फेऱ्यांच्या वेळा...पुणे ते लातूर या मार्गावर रात्री २२ आणि २२.३० वाजता बस मार्गस्थ हाेणार आहे. पुणे येथून उदगीरच्या दिशेने रात्री २१ वाजता बस सुटणार आहे. पुणे येथून अहमदपूरसाठी रात्री २०.४५ वाजता बस मार्गस्थ हाेणार आहे. पुणे येथून निलंगासाठी रात्री २०.१५ वाजता तर पुणे येथून औशासाठी रात्री २१.३० वाजता मार्गस्थ हाेणार आहे.

कॅन्टाेनमेंट येथून सहा फेऱ्या...पुणे शहरातील कॅन्टाेन्मेंट मैदान, खडकी येथून लातूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दरराेज रात्री सहा बसफेऱ्यांचे नियाेजन करण्यात आले आहे. प्रवाशांचे भारमाण पाहून अधिकच्या बसेस वाढविण्याचे नियाेजन परिस्थिती पाहून घेतला जाणार आहे. सध्याला लातूर विभागातील पाच आगारांतून जादा बसेसचे नियाेजन केले आहे. त्याचबराेबर औसा येथून औरंगाबाद मार्गावर बसेसची साेय केली आहे.

टॅग्स :state transportएसटीlaturलातूरDiwaliदिवाळी 2022