जवाहर नवोदयमध्ये अर्जास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:19 IST2020-12-29T04:19:09+5:302020-12-29T04:19:09+5:30

श्री केशवराज विद्यालयात नववी, दहावीचे वर्ग लातूर - कोरोनाच्या संकटामुळे श्री केशवराज विद्यालयात ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. ...

Extension of application in Jawahar Navodaya | जवाहर नवोदयमध्ये अर्जास मुदतवाढ

जवाहर नवोदयमध्ये अर्जास मुदतवाढ

श्री केशवराज विद्यालयात नववी, दहावीचे वर्ग

लातूर - कोरोनाच्या संकटामुळे श्री केशवराज विद्यालयात ऑनलाइन व ऑफलाइन वर्ग सुरू आहेत. विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. यशस्वितेसाठी कार्यवाह जितेश चापसी, नितीन शेटे, आनंदराज देशपांडे, मुख्याध्यापक संजय विभुते आदींसह शिक्षक परिश्रम घेत आहेत. प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी अशी आसन व्यवस्था करण्यात आली असून, उपाययोजनांचे पालन केले जात आहे.

तरुणांनी केली निराधारांना मदत

लातूर - लातूर शहरातील द इन्फिनिटी फाउंडेशनच्यावतीने निराधार नागरिकांना शाल तसेच अन्नदान करण्यात आले. यावेळी कासिफ आझमी, आदित्य कानडी, इशा कानडे, अमृता शिंदे, ओम लवटे, शिवाजी जडे, अभिजीत कंठाळे, हृषीकेश अदबलवार, अनम मुसा, श्रेया जैस्वाल, नयन बिराजदार, रिवेका खंडेलवाल, विजय थोरात आदींसह सदस्यांची उपस्थिती होती.

कला दालनासाठी जागा उपलब्ध करावी

लातूर - शहरात कलादालनासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडे लातूर जिल्हा कलाध्यापक संघटनेच्यावतीने करण्यात आली. यावेळी संघटनेचे बाबूराव भोसले, शिवाजी हांडे, गणेश राठोड, अशोक तोगरे, पद्माकर वाघमारे, अमोल देवकते, तेजस शेरखाने, ज्ञानेश्वर बेंबडे, राजकुमार वेदपाठक, गणेश म्हेत्रे, प्रवीण बडीगर आदींची उपस्थिती होती.

मनपाच्यावतीने ॲन्टिजन चाचण्यांवर भर

लातूर - शहर महापालिकेच्यावतीने रॅपिड ॲन्टिजन चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन केंद्र सुरू करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन तत्काळ तपासणी केली जात आहे. शहरात रुग्णसंख्या कमी होत असून, नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पारितोषिक वितरण

लातूर - महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, ऊर्जा मंत्रालय यांच्यावतीने ऊर्जा संवर्धन आणि व्यवस्थापन पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यामध्ये लातूर जिल्ह्यातील तिघांची निवड करण्यात आली होती. ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास ऊर्जा मंत्री नितीन राऊत, प्राजक्त तनपुरे, सुभाष डुंबरे, डी.व्ही. कुलकर्णी, केदार खमितकर, बी.के. नंदा यांची उपस्थिती होती.

राजमाता जिजामाता संकुलात सत्कार

लातूर - येथील विभागीय शिक्षण उपसंचालकपदी गणपतराव मोरे यांनी पदभार स्वीकारला. याबद्दल राजमाता जिजामाता संकुलाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डी.एन. केंद्रे आदींसह संकुलातील शिक्षक, प्राध्यापकांची उपस्थिती होती.

एमआयएम शहर कार्यकारिणी जाहीर

लातूर - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन शहर लातूरची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहर जिल्हाध्यक्षपदी अफजल कुरेशी, शेख रियाज, बरकत काझी, जब्बार पठाण, सय्यद मोहसीन, हाफिज समिउल्ला, अहाद पठाण, रहिम शेख, तजम्मुल मणियार, फारुख मणियार, अख्तर रजा, मसुद खान, मौलाना मोहसीन, ॲड. युनूस खान, रफिक कुरेशी, सलिम निचलकर, जकी सावकार, सय्यद इब्रान, अय्याज सलिम शेख, सलमान पठाण, हमिद बागवान, मन्सूर शेख, समीर शेख यांचा समावेश आहे.

शेतशिवारात रबीची पिके बहरली

लातूर - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असल्याने रबी हंगामाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पेरण्या पूर्ण झाल्या असून, सध्या पिकाला पोषक अशी थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे शेत-शिवारातील पिके बहरली आहेत. जिल्ह्यात ३ लाख २७ हजार हेक्टरवर रबीचा पेरा झाला असून, मागील महिन्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यासंदर्भात कृषी विभागातर्फे मार्गदर्शन केले जात आहे.

प्रदेशाध्यक्षपदी चव्हाण यांची निवड

लातूर - गोरसिकवाडी या सामाजिक संघटनेची वार्षिक बैठक पार पडली. या बैठकीत प्रा. संपत चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी देवीदास राठोड, प्रा. अनिल राठोड, प्रा. प्रवीण राठोड, यशवंत पवार, साहेबराव जाधव, प्रकाश पवार यांची उपस्थिती होती. आगामी काळात संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. चव्हाण यांनी सांगितले.

रयतु बाजार परिसरात स्वच्छतेची मागणी

लातूर - शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयतु बाजार परिसरात रात्रीच्या वेळी कचरा टाकला जात आहे. त्यामुळे सकाळी भाजीपाला खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मनपाच्यावतीने नियमित कचरा संकलन केले जात नसल्याची स्थानिक नागरिकांची ओरड आहे. भाजीपाला बाजारात आवक असल्याने मोठी गर्दी असते. त्यामुळे अस्वच्छतेचा त्रास नागरिकांना होतो. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

जिल्हास्तरीय युवा संसदेचे आयोजन

लातूर - जिल्हास्तरीय युवा संसदेचे बुधवारी सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात १८ ते २५ वयोगटातील स्पर्धक नोंदणी करू शकतात. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरण, उन्नत भारत अभियान, ग्रामीण अर्थव्यवस्था, नैसर्गिक शेती यावर चर्चा होणार आहे. २९ डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

धनेगाव येथे सत्कार कार्यक्रम

लातूर - जिल्हा काँग्रेस मीडिया सेलच्या जिल्हाध्यक्षपदी हरिराम कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल धनेगाव येथे माजी सरपंच हणमंत पाटील, रेणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Web Title: Extension of application in Jawahar Navodaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.