शहरं
Join us  
Trending Stories
1
Revanth Reddy : "राहुल गांधी पंतप्रधान असते तर त्यांनी PoK परत आणला असता"; रेवंत रेड्डी यांचा मोदींवर निशाणा
2
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
3
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
4
लोन मिळवून देण्याच्या नावावर सर्वाधिक लोकांना लागलाय चुना, गमावलेत ₹३३,१४८ कोटी
5
"अकाऊंट हॅक झालेलं तर गप्प का बसलात?" सुदेश म्हशिलकरांच्या स्पष्टीकरणानंतर प्राचीचा सवाल, म्हणाली...
6
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
7
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
8
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
9
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
10
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
11
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
12
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
13
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
14
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
15
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
16
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
17
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
18
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
19
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा

अवघ्या दोन मिनिटांत १७ आयफोनसह महागडे मोबाईल, लॅपटॉप लंपास; औशात सिनेस्टाईल चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 16:39 IST

दुकान फोडून मोबाईल लाखोंचा माल लंपास

- महेबूब बक्षी

औसा (लातूर) : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी तहसील कार्यालयासमोरच्या जीएम मोबाईल दुकानावर मंगळवारी पहाटे ३. १६ ते ३. १८ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी पोलिसांना चकवा देत धाडसी चोरी केली. सिनेस्टाईल पद्धतीने कार रस्त्यावर लावून दुकानाचे शटर तोडत अवघ्या दोन मिनिटांत 17 आयफोन , 13 मोटोरोलो कंपनीचे मोबाईल, 3 डमी फोन्स आणि 2 लॅपटॉप असा लाखोंचा ऐवज लंपास केला. चोरीची माहिती मिळताच औसा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले असून सकाळी ठसे नमुने घेतले गेले आहेत.

अज्ञात चार चोरटे नवी कोरी कार घेऊन औसामधील मुख्य रस्त्यावर आले. त्यांनी प्रथम न्यायालयासमोरील दुसरे मोबाईल दुकान फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेव्हा श्वान भुंकल्यामुळे शेजारील लोक जागे झाले. हे लक्षात येताच चोरटे तिथून पळाले आणि पुढे जीएम मोबाईल दुकान फोडले. चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीती आणि संताप पसरला आहे. शासकीय कार्यालयासमोर अशा प्रकारची धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये सुरक्षा यंत्रणांबाबत शंका व्यक्त होत आहे.

केवळ दोन मिनिटांत दुकान साफसंपूर्ण चोरीचा प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कारमधून एकजण बाहेर न येता बसून राहिला, तर इतर तिघांनी शटर तोडून चोरी केली. सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरी केवळ दोन मिनिटांत पार पडली. चोरटे सराईत असल्याचे स्पष्ट दिसते. नंबर नसलेली नवी कार वापरून त्यांनी ३:१६ ते ३:१८ च्या दरम्यान ही चोरी केली. दुकानमालक अकबर मणियार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरु आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर