इच्छुकांच्या चाचपणीत नेते मंडळींची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:16 IST2020-12-26T04:16:33+5:302020-12-26T04:16:33+5:30
... गावातील चौका- चौकात रंगू लागले गप्पांचे फड डिगोळ : शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ...

इच्छुकांच्या चाचपणीत नेते मंडळींची कसरत
...
गावातील चौका- चौकात रंगू लागले गप्पांचे फड
डिगोळ : शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सुमठाणा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. ही ग्रामपंचायत ७ सदस्यांची आहे. या निवडणुकीत नवख्यांचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. त्यामुळे गावातील चौका- चौकात गप्पांचे फड रंगू लागले आहेत. स्थानिक नेतेमंडळी नवीन चेह-यांना आणि आपल्या मर्जीतील इच्छुकास पसंती देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे चुरस वाढणार आहे. इच्छुक मंडळी एकमेकांशी आदराने वागू लागले आहेत.
...
दुस-या दिवशीही एकही नामनिर्देशनपत्र नाही
जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गुरुवारपर्यंत एकही नामनिर्देशनपत्र दाखल झाले नसल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली. सध्या इच्छुक मंडळी उमेदवारी दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करीत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर मोर्चेबांधणीस वेग आला आहे.