लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:14 IST2021-06-22T04:14:38+5:302021-06-22T04:14:38+5:30
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन लातूर : येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात ...

लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन उत्साहात
लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये योग दिन
लातूर : येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे समन्वयक रौफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योगा करून घेण्यात आला. याप्रसंगी प्राचार्या दुर्गा भताने उपस्थित होत्या. योग दिनानिमित मुलांनी ५० प्रकारांचे उत्तम रीतीने प्रात्यक्षिके करून दाखवली. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात योग दिन साजरा
लातूर : येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील राजमाता जिजामाता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व बारावी व्होकेशनल, तुळजाभवानी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि संगमेश्वर प्राथमिक विद्यालयात सोमवारी जागतिक योग दिन ऑनलाईन साजरा करण्यात आला. यावेळी के. ए. जायेभाये, सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे, मुख्याध्यापक संगमेश्वर केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, मुख्याध्यापिका स्वाती केंद्रे, मुख्याध्यापक आर. पी. मुंडे, मुख्याध्यापक अविनाश पवार, पर्यवेक्षक आर. डी. बिरादार, मदन धुमाळ, पांडुरंग कुलकर्णी, शोभा कांबळे, राजेंद्र जायेभाये, परमेश्वर गित्ते, शिवकांत वाडीकर आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.