इंडियन डेन्टल असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:19 IST2021-03-17T04:19:53+5:302021-03-17T04:19:53+5:30
व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बनसुडेज् टर्मिनेटर्सचा संघ प्रथम आला. तर डॉ. जोगदंड पॉवर हिटर्स संघ उपविजयी राहिला. डॉ. शितोळेज स्मॅशर ...

इंडियन डेन्टल असोसिएशनच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
व्हॉलीबॉल स्पर्धेत डॉ. बनसुडेज् टर्मिनेटर्सचा संघ प्रथम आला. तर डॉ. जोगदंड पॉवर हिटर्स संघ उपविजयी राहिला. डॉ. शितोळेज स्मॅशर किंग व डॉ. सोनकांबळेज् इनक्रिडिबल्स संघ अनुक्रमे विजयी ठरले. बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या दुहेरीत डॉ. सचिन बसुदे व डॉ. भीम खलंग्रे विजेते ठरले. उपविजेतेपदी डॉ. संजीवकुमार बिराजदार व डॉ. महेश बिलापट्टे राहिले. महिलांच्या दुहेरीत डॉ. सोनाली ब्रिजबासी व डॉ. स्नेहा चिखलीकर यांनी प्रथम स्थान पटकाविले. द्वितीयस्थानी डॉ. श्वेता भारती व डॉ. शीतल नागिमे राहिल्या. पुरुषांच्या टेबल टेनिस स्पर्धेत डॉ. महेश बिलापट्टे प्रथम, डॉ. रविकिरण तेलंगे द्वितीय, महिलांत डॉ. शिल्पा लटुरिया प्रथम तर डॉ. सोनाली ब्रिजवासी द्वितीयस्थानी राहिल्या. कॅरम स्पर्धेत डॉ. रचना बियाणी डॉ. अपर्णा विभुते यांनी प्रथम, तर डॉ. निलम पन्हाळे व डॉ. श्रुती कोडगी यांनी द्वितीय स्थान पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र स्टेट डेन्टल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना इंडियन डेन्टल असोसिएशन स्टेट स्पोर्टस् सेक्रेटरी डॉ. विभाकर मोटे, डॉ. मनोज वैष्णव, डॉ. शैलेश वंगे, डॉ. मुकेश आरडले यांच्या हस्ते चषक व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.