मनोहरतांडा आश्रमशाळेत शिक्षण दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:03 IST2021-01-08T05:03:01+5:302021-01-08T05:03:01+5:30
... जळकोट तालुक्यात मतदार जनजागृती जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग ...

मनोहरतांडा आश्रमशाळेत शिक्षण दिन उत्साहात
...
जळकोट तालुक्यात मतदार जनजागृती
जळकोट : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून मतदान करावे म्हणून निवडणूक विभागाच्यावतीने मंगळवारी मतदार जागृती अभियान राबविण्यात आले. तालुक्यातील कुणकी येथून या मोहिमेस प्रारंभ झाला. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.व्ही. सुरेवाड, अंगणवाडी कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित हाेते. निवडणूक होत असलेल्या २७ गावांमध्ये मतदार जनजागृतीसाठी डिजिटल फलक लावण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार संदीप कुलकर्णी यांनी दिली.
...
डांगेवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध
निलंगा : तालुक्यातील डांगेवाडी येथील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. ही ग्रामपंचायत ७ सदस्यांची आहे. नूतन सदस्यांमध्ये जनाबाई सुडे, गोविंद पाटील, दिलीप हुलसुरे, परमेश्वर सोनटक्के, कोमल हुलसुरे, अंजू फत्तेपुरे, लक्ष्मीबाई लव्हरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या ग्रामपंचायतीची गेल्या २० वर्षांपासून बिनविरोध निवडणूक होत आहे.