शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

हातभट्टी अड्ड्यांवर 'उत्पादन शुल्क'चा छापा; दारूसह ३५०० लिटर रसायन केले नष्ट

By राजकुमार जोंधळे | Updated: April 25, 2023 15:20 IST

यावेळी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दहा जणांना पथकाने अटक केली आहे.

लातूर : जिल्ह्यातील कोराळवाडी परिसरात सुरू असलेल्या हातभट्टीनिर्मिती अड्ड्यावर लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने छापा टाकला. यावेळी हातभट्टी दारूसह निर्मिती करण्यासाठी लागणारे रसायन पथकाने नष्ट केले. याबाबत पाच स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लातूर जिल्ह्यात काही पाेलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये राजरोसपणे अवैध दारूविक्री, हातभट्टी, विक्रीसह इतर बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहेत. या हातभट्टी अड्ड्याची माहिती लातूर येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. कोराळवाडी, कासार शिरसी (ता. निलंगा), काटगाव तांडा, वसंतनगर तांडा परिसरात बिनधास्तपणे हातभट्टीची निर्मिती, विक्री केली जात होती. या ठिकाणी उदगीर आणि लातूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्तपणे २१ ते २३ एप्रिल या कालावधीत  छापा टाकला. यावेळी १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, दहा जणांना पथकाने अटक केली आहे. त्यामध्ये १ हजार लिटर रसायन, २९५ लिटर हातभट्टी, ३८ लिटर देशी दारू, ३ लिटर विदेशी दारू, असा एकूण ५७ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे.

१३ गुन्ह्यांमध्ये केली दहा जणांना अटक...राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने २१ ते २३ एप्रिल या कालावधीत ठिकठिकाणी टाकलेल्या छापा सत्रात १० जणांना अटक केली आहे. त्यांच्या विराेधात १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे धाडसत्र पुढेही सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कोराळवाडीतील अड्ड्यावर रविवारी टाकला छापा...कोराळवाडीची कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, ए. के. शिंदे, एस. पी. काळे, ए. बी. जाधव, ए. आर. घोरपडे, पी. जी. कदम, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनंत कारभारी, ए. ए. देशपांडे, एस. जी. काळे, एस. ए. साळुंके, जी. आर. पवार, एस. व्ही. केंद्रे, देशमुख, कलवले, गवंडी, निरलेकर, पी. आर. खडके यांनी केली.

टॅग्स :laturलातूरalcohol prohibition actदारुबंदी कायदाExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग