भाजयुमोतर्फे माजी सैनिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST2021-04-08T04:20:02+5:302021-04-08T04:20:02+5:30
लातूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर शहरच्यावतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनपातील भाजप गटनेते शैलेश गोजमगुंडे, ...

भाजयुमोतर्फे माजी सैनिकांचा सन्मान
लातूर : भारतीय जनता युवा मोर्चाच्या लातूर शहरच्यावतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मनपातील भाजप गटनेते शैलेश गोजमगुंडे, शहर संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील-कव्हेकर, भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णाजी गिरी उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक चंद्रकांत दुधाळे, रघुनाथ बोरोळे, विलास सूर्यवंशी, मुकुंद कोटमाळे, प्रशांत डोके, रमेश मुळे, राम पांढरे, उमद सौदागर, अशोक बालगीर, मुकुंद हालसे, प्रदीप कुलकर्णी, शुक्राचार्य पवार, शाहुराज बनसुडे, उद्धव नागरगोजे, त्र्यंबक दंतराव आदींचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी सागर घोडके, संतोष ठाकूर, शंभुराजे पवार, गजेंद्र बोकन, गोविंद सूर्यवंशी, रवी लवटे, काका चौगुले, महादेव पवार, व्यंकटेश हंगरगे, सचिन सुरवसे, आकाश बजाज, गौरव बिडवे, विकास डुरे, आकाश पिटले यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी उपस्थित होते.