सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST2021-08-18T04:26:27+5:302021-08-18T04:26:27+5:30

लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी जागरूकता’ या विषयावरील एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. या वेळी ...

Everyone needs to be aware of cyber security | सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज

लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी जागरूकता’ या विषयावरील एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. या वेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे होते. या वेळी श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एम. बेटकर, प्राचार्य डाॅ. श्रीराम सोळंके, प्रा. शीतल पाटील, डॉ. राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे म्हणाले, सध्याच्या युगात जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. जगाचे जसजसे आधुनिकीकरण होत आहे, तसतशा पद्धतीने नवीन संकल्पना, डिजिटल व्यवहार होत आहेत. अशा या काळात सायबर सुरक्षा, सिक्युरिटीबाबत सजग असले पाहिजे. सायबर कायद्याबाबत समाजजीवनात जागृती झाली पाहिजे. समाजप्रबोधन झाले पाहिजे. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रा. शीतल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा सोनसाळे यांनी केले. आभार प्रा. शैलजा धुतेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्रा. सुजाता काळे, डाॅ. कोमल गोमारे, प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. शिवाजी आळणे, प्रा. किरण भिसे, प्रा. श्वेता मदने, डाॅ. रवींद्र सोळंके, डाॅ. रवींद्र शिंदे, डाॅ. रामशेट्टी शेटकार, डाॅ. गजानन बने, प्रा. कांचन कदम, प्रा. करुणा कोमटवार, प्रा. संगीता जाजू, प्रा. श्रेयस माहूरकर, डाॅ. महेश कराळे, प्रियंका हिप्परकर, प्रा. लहू काथवटे, प्रा. मंगेश आवाळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी...

आजचे युग माहिती तंत्रज्ञान, संगणकाचे आहे. संपूर्ण जग हे इंटरनेटच्या साह्याने एकमेकांशी जोडले गेले आहे. आज सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, गुगल, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम, युट्युब यांच्या वापराचे प्रमाण आता वाढले आहे. या जागतिकीकरणाच्या, सोशल मीडियाच्या जगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक वाढले आहे. यासाठी सायबर सुरक्षेबाबत प्रत्येक भारतीयांनी सावध असले पाहिजे. स्वतःची वैयक्तिक माहिती, गुगल पे, फोन पे, मनी ट्रांजेक्शन करताना कोणालाही देऊ नये, पासवर्ड, ओटीपी, क्रेडिट कार्डचा नंबर सांगू नये. इंटरनेट बँकिंग करताना काळजी घ्यावी.

Web Title: Everyone needs to be aware of cyber security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.