संत तुकाराम महाराज यांचा प्रत्येक शब्द हा सिद्धांत हाेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:19 IST2021-03-31T04:19:49+5:302021-03-31T04:19:49+5:30
महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमानिमित्त ...

संत तुकाराम महाराज यांचा प्रत्येक शब्द हा सिद्धांत हाेय
महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार होते. प्रा.डॉ. अनिल मुंढे म्हणाले, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला. त्यांचा वारंवार छळ होत राहिला. मात्र, त्यांनी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ विचारांच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य शेवटपर्यंत केले. श्री संत तुकाराम महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे संसारिक व्यक्तित्त्व आणि आध्यात्मिक व्यक्तित्त्वावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, वामन मलकापुरे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकांसह कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.