माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा... वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:39+5:302021-07-18T04:15:39+5:30

काेराेनाचे नियम पालन करत मुलीला माहेरी आणले... मे महिन्यात मुलीचा विवाहसाेहळा झाला. आषाढ महिन्यात पहिला सण येते. पहिल्या सणाला ...

Even if my mahera's path is blocked, the stone on the road will break. | माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा... वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा...

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा... वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा...

काेराेनाचे नियम पालन करत मुलीला माहेरी आणले...

मे महिन्यात मुलीचा विवाहसाेहळा झाला. आषाढ महिन्यात पहिला सण येते. पहिल्या सणाला मुलीस माहेरी आणण्याची परंपरा आहे. या परंपरेनुसार आजही नवविवाहित मुलीला आषाढात माहेरी आणले जाते. परिणामी, माहेरला आणण्यासाठी काेराेनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली.

- साहेबराव निकाळजे

पहिला आकड महिना माहेरातच...

लग्नानंतर पहिला आकड महिना पाळला जाताे. यासाठी नवविवाहितांचा आकड महिना हा माहेरातच असताे. मात्र, काेराेनाने प्रवासावर निर्बंध आणले आहेत. मात्र, काळजी घेत, नियमांचे पालन करत आम्ही मुलीला घरी आणले आहे. माहेरची ओढ लागलेल्या मुली आपण कसे राेखणार, हा प्रश्न आहे.

- सुनीता उदगीरकर

माहेरच्या आठवणी...

ज्या घरात, माहेरात लहानाची माेठी झाले. त्या माहेरच्या आठवणी मनात कायम घर करून राहतात. लग्न झाले तरी सासरी असलेल्या प्रत्येक मुलीला माहेरची ओढ असते. सध्याला काेराेनामुळे माहेरला जाण्यासाठी अडचणी येत आहेत. प्रवास करायचा म्हटलं तर असुरक्षित वाटत आहे.

- माेनिका लातूरकर

माहेरी जाता आले नाही...

मे महिन्यात काेराेना नियमांचे पालन करत माेजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न झाले. काेराेनाची दुसरी लाट ओसरत आली तरी, माहेरी जाताना अडचणी येत आहेत. सध्याला व्हिडिओ काॅलवरच माहेरच्या मंडळींशी संवाद साधावा लागत आहे. माहेरला जाण्याची ओढ मनात आहे. मात्र, सध्याला जाता येत नाही.

- अश्विनी जाधव

Web Title: Even if my mahera's path is blocked, the stone on the road will break.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.