हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:20 IST2021-04-09T04:20:31+5:302021-04-09T04:20:31+5:30
लातूर : खाजगी रुग्णालयांच्या समस्या सोडविण्यासाठी आयएमए अंतर्गत हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेची स्थापना झाली आहे. दरम्यान, आयएमए ...

हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेची स्थापना
लातूर : खाजगी रुग्णालयांच्या समस्या सोडविण्यासाठी आयएमए अंतर्गत हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेची स्थापना झाली आहे. दरम्यान, आयएमए अध्यक्षा डाॅ. सुरेखा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचा पदग्रहण सोहळा बुधवारी झाला.
हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेचे अध्यक्ष म्हणून डाॅ. दीपक गुगळे यांची तर सचिवपदी डाॅ. रवींद्र इरपतगिरे यांची सर्वानुमते निवड झाली आहे.
यावेळी आयएमएचे सचिव डाॅ. हनुमंत किनीकर, डाॅ. अशोक पोतदार, डाॅ. अजय जाधव, डाॅ. कल्याण बरमदे, डाॅ. अभय कदम, डाॅ. सूर्यवंशी, डाॅ. सौ. गुगळे, डाॅ. सौ. रामेश्वरी, डाॅ. सौ. किनीकर यांची उपस्थिती होती.
लातूरमधील सर्व खाजगी रुग्णालयांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सर्वेातोपरी प्रयत्न करू, असे नूतन अध्यक्ष डाॅ. दीपक गुगळे यांनी सांगितले.
यावेळी आयएमएच्या अध्यक्षा डाॅ. सुरेखा काळे यांनी हाॅस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाच्या लातूर शाखेतील पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.