कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी आढळले ८०४ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:18 IST2021-04-06T04:18:48+5:302021-04-06T04:18:48+5:30
दवाखाने, कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ९६ रुग्ण उपचार घेत आहेत. उदगीरच्या सामान्य ...

कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवशी आढळले ८०४ रुग्ण
दवाखाने, कोविड सेंटरमध्ये दाखल असलेले रुग्ण
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ९६ रुग्ण उपचार घेत आहेत. उदगीरच्या सामान्य रुग्णालयात ८२, डेडीकेटेड सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल १०२, तोंडार पाटी कोविड केअर सेंटर ८३, एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहात ५२२, मरशिवणी कोविड सेंटर ३६, मुलांची शासकीय निवासी शाळा औसा येथे ६६, उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे ३३, कृषी पीजी कॉलेज चाकूर ६२, पूरणमल लाहोटी तंत्रनिकेतन महाविद्यालय येथे ३००, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड लातूर येथे २०० रुग्ण उपचार घेत आहेत.
५१३ जण कोरोनामुक्त
सोमवारी प्रकृती ठणठणीत झाल्याने ५१३ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात एक हजार मुला-मुलींच्या वसतिगृहातील २९, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील २२, होमआयसोलेशनमधील ४४५ आणि खाजगी हॉस्पिटलमधील १४ अशा एकूण ५१३ जणांनी कोरोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१.४० टक्के झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण २.३ टक्के आहे.