अंबाजोगाई रोडवरील अतिक्रमण हटविले; लातूर मनपाची धडक मोहीम
By हणमंत गायकवाड | Updated: September 20, 2022 18:24 IST2022-09-20T18:24:08+5:302022-09-20T18:24:20+5:30
शहरातील सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत.

अंबाजोगाई रोडवरील अतिक्रमण हटविले; लातूर मनपाची धडक मोहीम
लातूर :लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गांधी चौक ते गंजगोलाईपर्यंत फूटपाथवर असलेले अतिक्रमण हटविण्यात आले. मंगळवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नवीन रेणापूर नाकापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले.
सकाळी नऊ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्याच्या फुटपाथवर अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत. यामुळे रहदारीला अडथळा होत असल्याने मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या सूचनेनुसार अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी नवीन रेणापूर नाका रस्त्यापर्यंत अतिक्रमण हटविण्यात आले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत अतिक्रमण विभागाचे पथक कार्यरत होते. तरीही या रस्त्यावरील पूर्ण अतिक्रमण हाटले नाही.त्यामुळे उद्या पण कारवाई करण्यात येणार आहे. अतिक्रमण विभागाचे प्रमुख रवी कांबळे, क्षेत्रीय अधिकारी कलीम शेख, महादेव फिसके, रवी शेंडगे, प्रल्हाद शिंदे, शिवाजी कुटकर यांच्यासह पोलीस कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते.