अहमदपूर शहरातील नव्या मोंढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला रोडपर्यंत नालीच्या पुढे अतिक्रमण झाल्याच्या अनेक तक्रारी नगर परिषदेकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी स्वतः अतिक्रमण विरोधी पथकाच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला असलेले ३० अतिक्रमणे हटवित मोठ्या वाहनांच्या रहदारीसाठी रस्ता खुला केला आहे. या भागात धान्याच्या मोठ्या ट्रकची ये-जा असल्यामुळे वाहतुकीस अडचण होत होती. सदर अतिक्रमण काढल्यामुळे मोंढ्याकडील वाहतूक सुरळीत झाली असून, व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. या अतिक्रमणविरोधी पथकात न.प.चे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, कार्यालयीन अधीक्षक सतीश बिलापट्टे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस कॉन्स्टेबल रमेश आलापुरे, अतिक्रमण विरोधी पथकाचे माधव पानपट्टी, सुनील कांबळे, शेख मुसा आदी नगरपालिकेचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
मोंढा रोडवरील अतिक्रमण नगर परिषदेने काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST