नेत्रदानासाठी नागरिकांना प्राेत्साहन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:24 IST2021-09-04T04:24:56+5:302021-09-04T04:24:56+5:30

नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, नेत्र प्रतिष्ठान ...

Encourage citizens to donate their eyes | नेत्रदानासाठी नागरिकांना प्राेत्साहन द्या

नेत्रदानासाठी नागरिकांना प्राेत्साहन द्या

नेत्रदान पंधरवड्यानिमित्ताने येथील माईर एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालय, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्टोमेट्री महाविद्यालय, नेत्र प्रतिष्ठान संचलित डी. एस. कराड आय इन्स्टिट्यूट, लातूर नेत्र तज्ज्ञ संघटना, सक्षम लातूर व लायन्स क्लब ऑफ लातूर हेल्थ केअर कॅम्प्स यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी नेत्रदान विषयावर आयोजित फेरीला जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नेत्रतज्ज्ञ डॉ. हनुमंत कराड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मणराव देशमुख, नेत्र विभागप्रमुख डॉ. उदय मोहिते, जिल्हा नेत्रतज्ज्ञ संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवाजीराव काळगे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक, जयंत क्षीरसागर, प्रा. कोहेकर, प्रा. तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन डॉ. आर. जी. कुलकर्णी यांनी केले तर आभार जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. श्रीधर पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, डॉक्टर, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते.

Web Title: Encourage citizens to donate their eyes