चिंच फोडीतून महिलांना रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:20 IST2021-03-27T04:20:02+5:302021-03-27T04:20:02+5:30
यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने चिंचेच्या झाडांना चिंचा मोठ्या प्रमाणात लगडल्या होत्या. त्यामुळे चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. ...

चिंच फोडीतून महिलांना रोजगार
यंदा पावसाचे प्रमाण चांगले झाल्याने चिंचेच्या झाडांना चिंचा मोठ्या प्रमाणात लगडल्या होत्या. त्यामुळे चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. चिमाचीवाडी परिसरात तिरू प्रकल्प असल्याने हाळी हंडरगुळीसह मोरतळवाडी, चिमाचीवाडी, आडोळवाडी, सुकणी या शिवारात चिंचेची झाडे बऱ्यापैकी आहेत. सध्या या परिसरात चिंच काढण्याचे काम वेगाने चालू आहे. विक्रेत्यांकडून चिंच काढल्यानंतर त्या फोडून विक्रीसाठी घेऊन जातात. झाडावरील चिंचा काढल्यानंतर त्या फोडण्यासाठी रोजगारी महिलांना घरी देऊन फोडून घेतलेल्या जातात. चिंचा फोडण्याचा दर १५ रुपये प्रति किलो असा आहे. एक महिला घरातील काम पूर्ण करून दहा ते पंधरा किलो चिंच फोडते. त्यामुळे दिवसाकाठी दीडशे ते दोनशे रुपये मिळतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने सध्या शाळा बंद आहेत. शाळेतील मुलेही घरीच आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात शालेय विद्यार्थीही चिंचा फोडण्याच्या कामात गुंतलेल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. आंबट चिंचेचा गोड आधार संसाराला मिळत असल्याने रोजगारी महिलांतून समाधान व्यक्त केले जात आहे.