दूध वाहतुकीतून शोधला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:20 IST2021-03-05T04:20:04+5:302021-03-05T04:20:04+5:30
शिरूर अनंतपाळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा ...

दूध वाहतुकीतून शोधला रोजगार
शिरूर अनंतपाळ : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. तसेच उद्योग, व्यवसाय बंद पडले. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेंद (उत्तर) येथील एका तरूणाने दूध वाहतुकीच्या व्यवसायातून रोजगार शोधला आहे. त्याने मोटारसायकलींचा कौशल्यपूर्ण वापर केला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी लाॅकडाऊन झाल्याने अनेकांच्या हातचा रोजगार गेला. नोकऱ्या गेल्या. उद्योग, धंदे बंद पडले. त्यामुळे बेरोजगारी वाढली. अशा परिस्थितीत तालुक्यातील शेंद (उत्तर) येथील बाळू शेळगे या युवकाने मोटारसायकलवर इतरांच्या दुधाच्या कॅनची वाहतूक करून नवा रोजगार शोधला आहे. शेळगे हा शेंद (उत्तर) येथून शंभू उंबरगा येथे स्वतः चे दूध देण्यासाठी जात असे. त्याने गावातील इतर ३० ते ४० जणांच्या दुधाचे कॅन घेऊन जाण्यास सुरुवात केली. एका कॅनला दहा रुपये प्रमाणे त्यास दररोज ३०० ते ४०० रुपये मिळत आहेत.
शेळगे याने दुचाकीचा योग्य वापर करीत दूध वाहतुकीसाठी लोखंडी स्टँड बनवून घेतले आहे. दूध वाहतुकीचे काम झाले की दुचाकीचा दुसऱ्या कामासाठी वापर करीत आहे.
आर्थिक अडचण दूर...
गावातील दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला शंभू उंबरगा येथील दूध डेअरीला जाणे शक्य नाही. त्यामुळे बाळू शेळगे याने दररोज ३० ते ४० दुधाचे कॅन घेऊन जात आहे. प्रत्येक कॅनला दहा रुपये वाहतुकीचा खर्च घेत आहे. त्यामुळे दररोज ३०० ते ४०० रूपये मिळत आहेत.