बँकांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांकडून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:20 IST2021-03-16T04:20:07+5:302021-03-16T04:20:07+5:30
केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. देशातील मोठ्या भांडवलदाराच्या हाता या बॅका साेपविण्याचा हा ...

बँकांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांकडून विरोध
केंद्र शासनाच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे. देशातील मोठ्या भांडवलदाराच्या हाता या बॅका साेपविण्याचा हा कुटील डाव आहे. आजपर्यंत बँकांचे कर्मचारी पगार वाढवा यासाठी संप करतात, अशी जनतेची, ग्राहकांची समजूत हाेती. मात्र, हा संप सर्वसामान्यांचा बँकेत ठेवलेला पैसा सुरक्षित रहावा, यासाठी आहे. १९६९ साली तत्कालीन सरकारने बँकाचे राष्ट्रीयकरण करून सामान्य जनतेचे हित जोपासले होते. मात्र, सध्याचे केंद्र सरकार त्याउलट निर्णय घेत आहे. या सरकाचा हा प्रवास उलट्या दिशेने सुरू आहे. देशभरातील बँकांचे खासगीकरण करण्याचा डाव आखण्यात आला आहे. या माध्यमातून देशातील मूठभर भांडवलदाराच्या घशात या बँका घालण्यासाठी हे प्रयतन सुरू आहेत. केंद्र सरकारचा हा कुटिल डाव हाणून, पाडण्यासाठी शेतकरी, व्यापारी, नोकरदारवर्ग त्याचबराेबर कष्टकरी जनतेनी या आंदोलनाला पाठीबा द्यावा, असे अवाहन करण्यात आले आहे. उदगीर येथील आंदाेलनात संघटनेचे अविराज गवळी, चंद्रकांत कांदे, विजय चालबा, सुशांत सावदेकर, नितीश शेंडे, रामदास कुरथुडे, कॉ. संजय तांदळे,अशोक बंडगर, अनिल आंबेसंगे, प्रवीणकुमार माने, दीपक केंद्रे, अमोल पस्तापुरे, अमोल गायकवाड, मोनाली कांबळे, नरसाबाई मुंढे, शिवाजी कोरनुळे, दिलीप जीरोबे, सचिन त्यांच्यासह विविध बँकांचे कर्मचारी सहभागी झाले हाेते.
दाेन दिवसीय आंदाेलन...
केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकांचे करण्यात येणारे खासगीकरण हेच चुकीचे धाेरण आहे, अशी टीका आंदाेलकांनी केली आहे. यातून केंद्र सरकार देशातील काही भांडवलदारांचे, मूठभर उद्याेगपतींचे हित साधण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून बँकांत ठेवलेला सामान्यांचा, व्यापाऱ्यांचा पैसा सुरक्षित राहणार नाही. अतिशय चुकीच्या पद्धतीने ही धाेरणे राबविण्याचा डाव सरकारचा सुरू असल्याने, याला देशभरात कडाडून विराेध हाेत आहे. देशव्यापी संपात उदगीर शहरातील बॅक कर्मचाऱ्यांनीही सहभाग नाेंदवत या खाजगीकरणाच्या धाेरणाला विराेध केला आहे. साेमवार आणि मंगळवार असे दाेन दिवस देशव्यापी संप बॅक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पुकारला आहे. याला उदगीर शहरातील कर्मचाऱ्यांनी आपला पाठिंबा देत, आंदाेलनात सहभाग नाेंदविला आहे.